Saturday, October 23, 2010

मराठीच्या भविष्याचा 'विश्वास'

Source: http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6800535.cms

Ref: http://www.satsangdhara.net/

http://kardakwadi.org/informativelinks


संपूर्ण ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, दासबोध, एकनाथी भागवत आणि सार्थ वाल्मिकी रामायण असे अनेक ग्रंथ फक्त एका माणसाने इंटरनेटवर आणले आ

हेत. त्यासाठी त्यांनी ना सरकारची मदत मागितली, ना हे मी केलेय याचा डंका पिटला... एकीकडे मराठी भाषेच्या संगणकीकरणाच्या नावे कोट्यवधींचा चुराडा होत असताना सांगलीच्या विश्वास भिडे यांचे हे काम मराठीच्या उज्ज्वल भवितव्याची साक्ष पटवते...

.........

नीलेश बने


मला खूप वाटते की हे व्हायला हवे, ते व्हायला हवे, पण मी एकटा काय करणार? असा प्रश्न जेव्हा कोणाला पडेल तेव्हा त्यांनी सांगलीच्या विश्वास भिडे यांच्याकडे पाहावे. वयाची साठी उलटलेल्या या काकांनी आयुष्याची संध्याकाळ सार्थकी लावण्यासाठी मराठीतले ग्रंथ इंटरनेटवर आणण्याचा संकल्प सोडलाय आणि गेल्या चार-पाच वर्षात त्यांनी केलेले काम खरोखरच अवाक् करणारे आहे.

आज मराठी भाषेच्या संगणकीकरणाविषयी खूप लिहिले, बोलले जात आहे. पण प्रत्यक्षात काम मात्र फार कमी ठिकाणी सुरू आहे, हे वास्तव आहे. साधा मराठी विश्वकोषही आपल्याला इंटरनेटवर आणता आलेला नाही. महाराष्ट्र सरकारने मराठीसाठी स्वतंत्र खाते उभारले आहे, मराठीसाठी खास धोरणही आखलेय आहे. पण त्या धोरणात म्हटलेले संगणकीकरण साक्षात् मंत्रालयातही झालेले नाही. अशी परिस्थिती असताना भिडे यांनी काय-काय केलेय ते पाहायचे असेल तर www.satsangdhara.net या साइटला भेट द्या.

एक माणूस काय करू शकतो हे ही साइट पाहिल्यानंतर कळून चुकते. या साइटवर ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, दासबोध, एकनाथी भागवत, सार्थ वाल्मिकी रामायण हे संपूर्णत: संगणकीकृत केलेले सापडतील. पण हे सारे काम कोणी केले म्हणून पाहायला जाल तर ते शोधूनही सापडत नाही. फक्त एक इ-मेल पत्ता सापडतो तोही satsangdhara@gmail.com असा. खूप शोध घेतल्यानंतर कळले की सांगलीमधल्या विश्वास भिडे यांनी ही साइट तयार केली आहे.

अध्यात्माची गोडी जपण्यासाठी त्यांनी जरी हा उपक्रम सुरू केला असला तरी त्यातून मराठीचे प्रचंड मोठे ज्ञानभांडार साऱ्या जगासाठी खुले झाले आहे. ते स्वत: मात्र आपण काही मोठे केलेय, असे मान्य करायला तयार नाहीत. ते म्हणतात, मी माझा विरंगुळा म्हणून हे केले. मला अजून खूप काही करायचे आहे. अजून बरेच काम बाकी आहे.

सध्या वाल्मिकी रामायणाचा मराठी अनुवाद आणि ऋग्वेदाची दहाही मंडले इंटरनेटवर आणण्यासाठी ते काम करत आहेत. दिवसाचे आठ ते दहा तास कॉम्प्युटरवर काम करणाऱ्या भिडेकाकांचा उत्साह तरुणांना लाजवणारा आहे. तरीही ते आपल्या कामावर संतुष्ट नाहीत. ते म्हणतात, की हे सारे ज्ञान लिखित स्वरुपात आहे. त्याचे ऑॅडिओ रुपांतर झाले तर ते कुणाला कधीही मोबाइलमधून, आयपॉडमधून ऐकता येईल. त्यासाठी नमुना म्हणून गांेदवलेकर महाराजांची प्रवचने ऑॅडिओ स्वरुपात आणण्याचे काम त्यांनी सुरू केलेय.

या साऱ्या कामाची प्रेरणा काय असे विचारवल्यावर ते सांगतात की, बँक ऑॅफ इंडियामध्ये नोकरी करताना मी आधी ज्ञानेश्वरीची पारायणे करत असे. पण बाहेरगावी गेलो की दरवेळी ज्ञानेश्वरीची प्रत घेऊन जाणे अवघड जायचे. म्हणून मग मनात असा विचार आला की, सोबत असणाऱ्या लॅपटॉपवर ज्ञानेश्वरी वाचता आली तर? म्हणून इंटरनेटवर शोधले तर काहीच सापडले नाही. कानडी आणि तामीळ भाषेतील अनेक ग्रंथ इंटरनेटवर सापडले. तसं मराठीत काहीच नाही, हे जाणवले. जे काही मराठीत सापडले ते बरेच ललित, कविता असे होते. मग म्हटले मीच माझ्यासाठी ज्ञानेश्वरी टाइप करायला घेतो. हीच प्रेरणा ठरली आणि हे ग्रंथ इंटरनेटवर आणण्याचा छंद जडला.

पण अध्यात्मिक साहित्याकडेच का वळलात असे विचारल्यावर ते म्हणतात, अध्यात्म हे काही फक्त ज्येष्ठांचे क्षेत्र नाही. पण वय उतरत चालले की देवाची ओढ लागते हे मात्र खरे. मला आधीपासून अध्यात्माची गोडी होतीच. मग निवृत्तीनंतर माझ्या या मोकळ्या वेळाचा सदुपयोग करण्यासाठी मला हे काम महत्त्वाचे वाटले. मराठीत अन्य इतर पुस्तके असतील पण पिढ्यान्पिढ्या टिकून राहिलेले मराठीचे जे संचित आहे ते ग्रंथ आध्यात्मिक आहेत. ते इंटरनेटवर उपलब्ध व्हायला हवेत, असे वाटले आणि 'ज्ञानेश्वरी'पासून सुरुवात केली.

भिडेकाका बँक ऑॅफ इंडियासाठी हैदराबादमध्ये काम करत होते. त्यावेळी त्यांना स्वामी चिन्मयानंदांची प्रवचने ऐकण्याचा योग आला. त्यांच्या ओजस्वी वाणीने त्यांना अध्यात्माची रूची वाढत गेली. मग ते नऊ वषेर् चंदपूरमध्ये होते. तिथे हे अध्यात्म अधिकच जवळ आले. नोकरीत अनेक कलहांना सामोरे जावे लागले. पण सोबतीला ही अध्यात्माची ताकद असल्याने या कलहाचा त्रास करून घ्यायचा नाही असे त्यांनी ठरवले आणि व्हीआरएस स्वीकारली. पण ही निवृत्ती नव्हती तर स्वेच्छानिवृत्ती होती. त्यामुळे आपला मोकळा वेळ योग्य त्या ठिकाणी खर्च करायचा हे त्यांनी मनापासून ठरवले होते. त्यातून हा उपक्रम जन्माला आला.

भारतात ८० च्या दशकात कॉम्प्युटर आला. तेव्हापासून सुदैवाने कॉम्प्युटर हाताळायची सधी त्यांना मिळाली. आज त्यांच्याकडे असलेला कॉम्प्युटर हा पाचवा कॉम्प्युटर आहे. त्यामुळे ते सतत प्रयोग करत राहिले आणि त्या प्रयोगातून शिकत राहिले. आज सर्वत्र मराठी फाँटचा गांेधळ असताना त्यांनी युनिकोडसारखे आधुनिक तंत्र आत्मसात केले. एवढेच नाही, तर वेबसाइट तयार करण्यासाठी लागणारे अत्यावश्यक 'एचटीएमल प्रोग्रामिंग'ही शिकून घेतले.

कार्यपद्धतीबद्दल विचारल्यावर ते सांगतात की, एक तर ही अध्यात्मिक पुस्तके खूप जड असतात आणि त्यांच्या फॉन्टच्या आकारामुळे वाचताना बऱ्याचदा त्रासही होतो. पण आज जे वृद्ध होत आहेत, ते कॉम्प्युटर सॅव्ही नसले तरी त्यांना कॉम्प्युटर नवा नाही. त्यांनी कॉम्प्युटरवर काम केले आहे. मला तरी कॉम्प्युटरवर वाचता येते. माझ्या पुढील प्रत्येक पिढीसाठी ते सहज शक्य आहे. तसेच कॉम्प्युटरवर फॉन्ट बदलता येतो. लहान-मोठा करता येतो. त्यामुळे हे वाचन अधिक सुलभ ठरेल.

त्यांच्या सत्संगधारा या साइटवर जे ग्रंथ ऑॅनलाइन केले आहेत, ते युनिकोड स्वरुपात आहेत. पण त्याही पलीकडे रामायण, महाभारतापासून रिचर्ड बाखच्या 'जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल'पर्यंतचे अनेक पुस्तके त्यांनी http://www.scribd.com/people/view/635222-vishwas-bhide या लिंकवर पीडीएफमध्येही ऑॅनलाइन केली आहेत. इंटरनेटवर त्यांचे हे काम वाखाणलेही गेलेय. आजपर्यंत या पुस्तकांच्या पानांना दोन लाखाहून अधिक लोकांनी भेट दिलीय.

तुम्हाला कोणी मदत केली नाही का? असे विचारल्यावर ते हसत म्हणतात, अनेकजण शोधत शोधत माझ्यापर्यंत पोहोचतात. काम आवडल्याचे कौतुक करतात. आम्हीही सहभागी होऊ म्हणतात. पण फार कमी जणांचा उत्साह टिकतो. हे काम किचकट आहे. प्रत्येक शब्द अचूक लिहिणे, त्याचे सातत्याने मुदितशोधन करणे ही कामे खूप वेळ घेतात. त्यामुळे इथे चिकाटी फार महत्त्वाची आहे. सध्या दुबईतील संजय प्रधान त्यांना अशी मदत करत आहेत.

एवढे काम करूनही भिडेकाका थकलेले नाहीत. ते या कामाचे श्रेयही घ्यायला उत्सुक नाहीत. ते म्हणतात, ज्ञानेश्वरांनी कॉपीराइट घेतले होते का?... मग मी का घ्यायचे? त्यांनी जे लिहिले ते फक्त मी कॉम्प्युटरवर उतरवले. यात माझी भूमिका माध्यमाची आहे. हे ज्ञान साक्षात माऊलींच्या लेखणीतून उमटले असल्याने त्यावर सर्वांचा अधिकार आहे. त्यामुळे मी ते प्रोटेक्टेड वगैरे करण्याचा काहीच प्रश्न नाही. अनेकजण साइटवरून अख्खी ज्ञानेश्वरी उतरवून घेतात आणि त्यांच्या साइटवर लावतात. मला फक्त एवढे वाटते, ज्यांना कोणाला उतरावयचे त्यांनी फक्त या साइटवरून घेतले एवढा उल्लेख करावा. शेवटी हे ज्ञान जास्तीत जास्त ठिकाणी पसरावे एवढाच उद्देश आहे.

भिडेकाकांसारखी माणसे जेव्हा सापडतात, तेव्हा मराठी भाषेच्या भवितव्याबद्दलचे किंतु-परंतु कमी झाल्यासारखे वाटतात. एकीकडे मराठी भाषेच्या नावाने अनेकांनी देव पाण्यात ठेवले असताना, दुसरीकडे भिडेकाकांसारख्यांनी त्याच देवांवर श्रद्धा ठेवत आपल्या परीने मराठीची ही पालखी खांद्यावर घेतलेली पाहून विश्वास अधिक दुणावतो, हेच खरे.

UPSC New Syllabus

http://upsc.gov.in/exams/misc/csp2011-syll.pdf

UNION PUBLIC SERVICE COMMISSION; PRESS NOTE

Subject: Changes in syllabus and pattern of the Preliminary Examination from
2011 in the scheme of Civil Services Examination

• As per the decision of Government of India, there shall be change in the syllabus and
pattern of the Preliminary Examination from 2011 in the scheme of the Civil Services
Examination.
• The Preliminary Examination shall now comprise of two compulsory Papers of 200
marks each and of two hours duration each. Detailed below is the new syllabus and
pattern of the Preliminary Examination, which is brought to the notice of the
prospective candidates intending to appear at the Civil Services Examination (CSE) in
2011 onwards:

Paper I - (200 marks) Duration: Two hours
• Current events of national and international importance
• History of India and Indian National Movement
• Indian and World Geography - Physical, Social, Economic geography
of India and the World.
• Indian Polity and Governance – Constitution, Political System,
Panchayati Raj, Public Policy, Rights Issues, etc.
• Economic and Social Development – Sustainable Development,
Poverty, Inclusion, Demographics, Social Sector Initiatives, etc.
• General issues on Environmental ecology, Bio-diversity and Climate
Change - that do not require subject specialization
• General Science.

Paper II- (200 marks) Duration: Two hours
• Comprehension
• Interpersonal skills including communication skills;
• Logical reasoning and analytical ability
• Decision making and problem solving
• General mental ability
• Basic numeracy (numbers and their relations, orders of magnitude
etc.) (Class X level), Data interpretation (charts, graphs, tables, data
sufficiency etc. -Class X level)
• English Language Comprehension skills (Class X level).
• Questions relating to English Language Comprehension skills of Class X level
(last item in the Syllabus of Paper-II) will be tested through passages from
English language only without providing Hindi translation thereof in the question
paper.
• The questions will be of multiple choice, objective type.
• A set of sample questions for both Papers would be put on the UPSC website
http://www.upsc.gov.in in due course for reference of the prospective candidates.
• The prospective candidates are advised to note that no changes are being introduced
at this stage in the Civil Services (Main) Examination and Personality Test in the
scheme of Civil Services Examination (CSE).

Tuesday, October 19, 2010

कॅन्सरग्रस्त बालकांना 'टाटा'चा दिलासा

Source: http://72.78.249.107/esakal/20101020/5228931008749872148.htm

शर्मिला कलगुटकर - सकाळ वृत्तसेवामुंबई - कर्करोगासारख्या असाध्य व्याधीतून रुग्णांना बरे करण्यासाठी, अत्याधुनिक उपचार करणाऱ्या टाटा मेमोरिअल रुग्णालयाने आता कर्करोग झालेल्या देशभरातील लहान मुलांसाठी पन्नास कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. "रुही' असे त्याचे नाव असून त्यातून या चिमुकल्यांना संपूर्णपणे मोफत उपचार दिले जाणार आहेत.

देशाच्या कानाकोपऱ्यातून कित्येक कर्करोगग्रस्त मुले उपचारासाठी टाटा रुग्णालयात येत असतात; पण या उपचारांचा डोंगराएवढा खर्च करण्याइतके या मुलांचे पालक सक्षम नसतात. अशा मुलांना या रुग्णालयात संपूर्ण वैद्यकीय खर्च मोफत मिळावा, असा या उपक्रमाचा उद्देश आहे. विविध स्वयंसेवी संस्था आणि समाजातील दानशूर व्यक्ती रुग्णालयास विविध माध्यमातून देणग्या देत असतात; मात्र त्यातून उभा राहणारा निधी या आजाराशी झुंजत असणाऱ्या व्यक्तीसाठी पुरेसा नसतो. अनेकदा केवळ औषधोपचारांचा खर्च लाखांच्या घरात असतो. उद्याचे भविष्य म्हणून ज्या मुलांकडे आशेने पाहिले जाते, त्यांच्याभोवती असलेली या आजाराची मगरमिठी सोडविण्यासाठी "टाटा'ने आता पुढाकार घ्यायचे ठरवले आहे. डॉ. रोहिणी केळकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पान्वये पन्नास कोटी रुपयांचा निधी गोळा करण्यात येणार आहे. त्यासाठी अमित शेख या प्रख्यात धावपटूचे मोलाचे सहकार्यही लाभणार आहे. विविध कॉर्पोरेट कंपन्या, तसेच आरोग्याच्या प्रश्‍नांवर कार्यरत असणाऱ्या संस्थांनी पुढे येऊन याकामी मोलाची मदत करावी, असे आवाहन डॉ. केळकर यांनी केले आहे. मागील काही वर्षांच्या पाहणीमध्ये लहान मुलांमधील कर्करोगाचे प्रमाण वेगाने वाढते आहे. केवळ उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून कित्येक पालकांना दारोदारी भटकावे लागते. त्यातूनही गोळा होणाऱ्या निधीमध्ये औषधांचाही खर्च निघत नाही; पण आता वैद्यकीय सुविधांचा वाढलेला खर्च, त्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी मोजावी लागणारी किंमत लाखांच्या घरात आहे. त्यामुळे रुग्णालयाकडे असणारे आर्थिक बळही तितके पुरेसे नसल्याचा अनुभव डॉ. केळकर सांगतात. म्हणूनच "रुही'सारख्या प्रकल्पामधून उभा राहणारा पैसा हा केवळ लहान मुलांना या व्याधीतून पूर्णपणे बाहेर काढण्यासाठी खर्च करता यावा, असा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉक्‍टर, रुग्णांचे नातेवाईक, तसेच आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या विधायक संघटनांच्या काही सदस्यांचाही या उपक्रमात मोलाचा सहभाग असेल. पहिल्या टप्प्यांमध्ये अमित शेख हे प्रख्यात धावपटू पुणे- मुंबई हे 36 तासांचे अंतर केवळ याच कारणासाठी पूर्ण करणार आहेत. त्यांच्या उद्देशाला पाठिंबा देणाऱ्या संस्था, संघटना तसेच दानशूर व्यक्तीच्या मदतीने निधीची उभारणी करण्यात येणार आहे.

The Balkrishna Knowledge Center

The movement plans to apply science and technology for rural development in the fields of agriculture, education and healthcare. The Balkrishna Knowledge Center at Kardakwadi, Newasa Taluka is  spearheading this transformation. The Center is developed on the philosophy that education doesn’t just help people earn a livelihood but also helps them add value to their lives.  It is being developed as a world-class Professional Training Center for bright students in Maharashtra. 
  
One of initiatives is to coordinate 65 high-schools for monthly newsletter circulation, giving updated career guidance information. Those who wish to pursue the dream  of appearing for competitive exams to join the Indian Civil Services receive precise information for UPSC/MPSC. Reputed training  institutes from Pune/New Delhi are suggested for proper guidance.

The core group firmly believes that all- round development in India can come only through practicing clean politics. Under the Clean Politics drive, the Center encourages people to vote for the right candidates. The political system is unarguably the best tool for reaching out to and  serving India’s teeming millions. Voters are reminded that "Bad Leaders Are Elected By Good People Who Do Not Vote!".  Instead of getting impressed by material wealth, people should think of the candidate's values, his plans for the constituency and vision for next generation of the society. Educated youths are encouraged to participate in the Indian electoral process from Panchayat to Parliament level elections. It is the group’s cherished belief that the smallest change at rural level will collectively bring a great change at national level. Use of money, muscle power in politics should be eliminated to ensure a better future for citizens. Instead of divisive politics, youth are encouraged to focus on developmental politics.

Kardakwadi...A Global Village Initiative

Dr. Bharat Kardak and his friends have made up their mind to transform Rural Maharashtra. The movement named "Kardakwadi...A Global Village Initiative" is aimed to unite the educated and cultured youth of  Rural Maharashtra and work towards the betterment of the region. This is an example to re-establish the glory of lost villages in rural India. The exemplary work already underway will act as a catalyst for the growth and development of all the hundred and twenty villages of Newasa Taluka of Ahmednagar Districy.   The group is inspired by the freedom-seeking struggle of Chhatrapati Shivaji Maharaj, Mahatma Gandhi’s self- reliance and the pursuit of pure and eternal knowledge by Saint Dnyaneshwar. The role-model for the group initiatives is the concept PURA (Providing Urban Amenities to Rural Areas) by former Indian President Dr. A.P.J. Abdul Kalam.

This  unique movement now taking shape in rural Maharashtra is sowing the seeds of change and transformation in Newasa Taluka. The region is well on its way to be counted as an educational and cultural capital of Maharashtra in the coming years.


Contact us:


गांव हरवलेला माणुस

www.kardakwadi.org

(हा लेख मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथे एप्रिल २०१० मध्ये झालेल्या 'अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलना' निमित्त प्रकाशित केलेल्या "हितगुज' विशेषांका मध्ये प्रसिद्ध झाला होता. विशेषांकाचे प्रकाशन जेष्ठ अभिनेते श्री. विक्रम गोखले ह्यांचे हस्ते झाले होते - श्री. भारत करडक)
प्रसंग १:
      स्पेन मधील एक समुद्र किनारा. नेहमीप्रमाणे शुक्रवारी संध्याकाळी समुद्रकिनार्‍यावर फिरत असताना एक आशियायी चेहर्‍आने ओळखीचे स्मित दिले. मी ही हसलो. पुर्ब गावात मी एकटाच भारतीय असल्याने कुणी भारतीय वा आशियायी दिसला कि मी लगेच दोन शब्द बोलायला बघतो. यावेळी, समोरचा चेहरा ही बोलायला जास्त उत्सुक आहे असे वाटले. साधारण पन्नाशीचे वय, काळा रंग, मजबुत शरीर, चेहर्‍यावर एका जखमेचा ठळक व्रण! तो श्रीलंकेचा होता, भारताबद्दल विषेश आस्था होती. बाळासाहेब ठाकरे अन इंदिरा गांधींबद्दल अत्यंत आदराने बोलला. त्यांच्या आयुष्यात ह्या दोघांना देवापेक्षाही वरची जागा आहे असे म्हणाला.
      वीस वर्षा पुर्वी तो श्रीलंकेतील एका खेडे गावात राहत असे. त्याचे आई-वडिल, भाऊ, बहिणी अन इतर कुटुंबीय. सुखाने जीवण जगत होता. लग्न ही ठरले होते..स्वपाळु दिवस होते! पण भविष्यात काही ऑरच लिहिलेले होते..... अचानक काही मित्रांच्या सांगण्यावरुन तो तामिळ अस्मितेसाठी सुरु झालेल्या हिंसक लढ्यात  ओढला गेला. हाती शस्त्र आहे, अन तरुण रक्ताला साजेश्या पद्धतीने त्याने सरकारी यंत्रणे विरुद्ध बंड पुकारले. पण लढाई म्ह्टले कि हार जीत आलीच. एक दिवस गावावर सरकारी सैन्याने हल्ला केला. अन ह्याच्या स्वनांचा चक्काचुर झाला.. तो अन त्याचे काही साथीदार पळुन जाण्यात यशस्व्व झाले पण बाकी पुर्ण गाव नष्ट झाले. सगळे कुटुंबिय अन त्याची भावी जीवनसाथी मारले गेले.
      संपुर्ण कुटुंब नाहिसे झाल्यावर हिंसक मार्गाचा तितकारा वाटु लागला. आपण मारलेल्या लोकांनाही आई वडिल भाऊ बहिण असतील .... हा विचार प्रथमच मनात आला. शस्त्र खाली टाकले. पण तथाकथित क्रांतीच्या या मार्गावर परतीचे मार्ग नसतात हे लगेच ध्यानात आले. जे साथीदार होते, तेच मारेकरी म्हणुन जीवावर उठले. जीव मुठीत धरुण देश सोडुन परदेशात आश्रय घ्यावा लागला. दक्षिण आशिया तीन अनेक देश पालथे घालुण शेवटी युरोपातील एका देशात आश्रय मिळाला. पण जीववरची भीती कमी झाली नाही!
     आता व्यवसायात चांगला स्थिरावला होता. आशियातील अनेक देशांतुन वस्तु  आणुन युरोपात विकण्याच्या व्यावसायात खुप प्रगती केली होती. आर्थिक दृष्ट्या संपन्न झाला होता. मध्यंतरी एक जीवनसाथी ही मिळाली होती अन दोन बछड्यांसह आयुष्य अगदी सुखात चालले होते...
     पण असा एक दिवस येतो जेंव्हा 'आपल्या' कडचे कुणीतरी भेटते, अन मग जुन्या जखमा पुन्हा ताज्या होतात. जुने गाव पुन्हा आठवते. आई वडिल भाऊ बहिनी अन सर्वच जण नजरेसमोर दिसतात..... पण आता गाव हरवलेले असते अन त्याचे स्वप्न फक्त मनात घर करुन राहिलेले असते!
प्रसंग २:
युरोपातील एक प्रक्यात संशोधन संस्था. मी नुकताच पोस्ट डॉक्टरेट साठी तिथे रुजु झालेलो. पंचविसीतील एक जर्मन (!) तरुणी माझ्या लॅब ला पी एच डी साठी प्रवेश घेते. सुंदर, हुषार अन अभ्यासाव्यतिरिक्त कला, संस्कृती, खेळ यांत रस असणारी! दिवसाचेच नव्हे तर आठवड्याचे वेळापत्रक काटेकोर पणे आखलेले अन एक वेळ सुर्य उगवायचा विसरेल पण पॅट्रिशिया (तिचे नाव) वेळापत्रकातील वेळ चुकु देणार नाही. सोमवारी स्विमिंग, मंगळवारी स्पॅनिश भाषा, बुधवारी टेनिस, गुरुवारी लॅटीन नाच, शुक्रवारी फ्रेंच भाषा असा संशोधनाव्यतिरिक्त च्या वेळेतील भरगच्चा कार्यक्रम. शुक्रवार अन शनिवार फक्त कुटुंबाकरिता (तिचा जोडीदार त्याच शहरातील दुसर्‍या संशोधन संस्थेत पी एच डी करत होता)..!
        आशियायी कुटुंबाचा अनुभव असेल तर पास्चात्य देशांत कुटुंब फारच कृत्रीम नाती असलेले वाटते. पण पॅट्रिशिया ला भारतीय/ आशियायी कुटुंब म्हटले कि स्वतःचे कुटुंब आठावायचे अन ती हळवी व्हायची.
       ती दहा वर्षाची असताना पोलंड मधुन तिच्या आई वडिलांसह एका रात्री च्या खदतर प्रवासात ती जर्मन प्रदेशात आली. दहा वर्षाची असल्याने पोलंड मधील मुळ गावात तिच्या आठवणी तश्या कमीच होत्या, पण खेळातील सवंगडी, शेजारची काही कुटुंबे, सायकल शिकताना पदलेले दात, कुत्र्याचे पिल्लु! अन सर्वात महत्वाचे म्हणजे क्म्युनिस्ट तावडीतुन सुटुन स्वतंत्र जगात जाण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न करणारे गावातील अनेक कुटुंबे!!  एक प्रयत्न विफल झाला कि काही दिवस विश्रांती घेऊन पुन्हा नवीन जोडीदार शोधुन (मागच्या प्रयत्नातील अनेक जण मध्यंतरी तो विचार सोडुन देतात किंवा इतर मार्ग पत्करतात) तिचे आई वडिल संपुर्न कुटुंबाला जर्मन प्रदेशात घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत.
      अन एक दिवस त्यांच्या प्रयत्नांना यश येते. एक मध्यरात्री पॅट्रिशिया ला नवा गांव मिळतो. तिथे ती लहानची मोठी होते. शाळा , कॉलेज, मित्र, मैत्रिणी भरपुर मिळतात. उच्च शिक्षणासाठी ती पुन्हा नव्या गावी येते..... नवनव्वीन देशातील मित्र भेटतात. त्यातील काही पोलंडचे ही असतात... अन जुन्या गावातील कोणी आहे का? अशी पुसटशी शंका मनात घेऊन ती त्याला गावाचे नाव विचारते! अजुन तिला कुणी तिच्या जुन्या गावातले कुणी भेटलेले नाही....पण तिने माघार घेतलेली नाही!!!
प्रसंग ३:
           ऑस्ट्रेलियातील एक समुद्र किनारा. शुक्रवारी संध्याकाळी समुद्रावर फिरत असताना एक वृद्ध जोडपे बाकावर बसलेले दिसते. भारतीय असतील अशी शंका मनात ठेवुन मी हसतो. (इथे खुप भारतीय आहेत, त्यामुळे मी बरेचदा ओळख काढायचा प्रयत्न करतो, पण समोरची व्यक्ती मात्र पाहुण न पाहिल्या सारखे करुन निघुन जाते!) पन मग, ते जोडपेही ओळखीचे हसतात. मग मी पुधे जाऊन नमस्कार  करतो अन बोलु लागतो. चक्क हिंदी भाषेत बोलु लागतात.(माझ्यासारखेच त्यांना ही मी बोलायला थांबलो म्हणुन आस्चर्य वाटते!.. पहिला धागा जुळतो.)
            दोघे ही वयाची सत्तरी पार केलेले. केस रुपेरी पण मन तरुण. मुलगा मुलगी दोघे ही डॉक्टर अन सुखी संसारात जम बसलेले. प्रापंचिक काळजी काहीच नाही. मुळचे अखंड हिंदुस्थानचे! लाहोर जवळचे. (आता ते पाकिस्तानात गेलेले) लाहोर पाकिस्तानात गेले तेंव्हाच हे जोडपे अन अशी असंख्य 'विजातीय' जोडपी पाकिस्तानातुन बाहेर पडली. तरुण रक्त असल्याने आगीतुन वाचले, जे काही हाती लागले ते घेउन जीव मुठीत धरुन जन्मगाव सोडुन पळाले. जुन्या आठवणी ... अग्निकुंडात स्वाहा!
            आफ्रिकेच्या अनेक देशां मध्ये नशीब आजमावुन शेवटी दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधींची पुण्यायी कामी येते. संसार चालु लागतो, मुले शिकतात. मग एक दिवस मुलांच्या आग्रहाखातर ऑस्ट्र्लियाला येणे होते. आता नोकरीतुनही निवृत्ती झालेली. मग असेच कुणी 'आपले' भेटतात का? म्हणुन फिरत राहतो. ओळख दाखवेल त्याला मनातले गाव दाखवायचे अन मनातच खुश व्हायचे! काही लोकांना किमान पुन्हा फिरुन जुण्या गावी जाण्याची शक्यता तरी आहे..पण ह्यांना तर गावच राहिला नाही! आता गांव फक्त स्वप्नात!
प्रसंग: ४
      युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया ई प्रगत देशातील एखाद्या मोठ्या शहरातील सुख-सुविधांनी युक्त अश्या घरामध्ये बसलेला 'मी'!!! वयाची २०-२५ वर्षे भारतातील छोट्या छोट्या खेड्यांमध्ये घालवल्यानंतर उच्चा शिक्षण अन नंतर नोकरीसाठी गेली सात-आठ वर्षे अश्या मोठ्या मोठ्या देशातील मोठ्या मोठ्या शहरांमध्ये राहत आहे. अभ्यासाच्या काळात अभ्यास अन कामामध्ये इतका बुडलेला कि बाकी जगाचा विसर पडावा... आता अभ्यास संपुन ठराविक वेळेची नोकरी सुरु झाल्यावर मात्र, आसपास काय चाल्लेय? कसे चाल्लेय? अन मुख्य म्हंजे 'आपलं' कुणी  आपलं दिसतय का? हे बघायला सुरुवात केलेली...  माझ्या गावापेक्षाच नव्हे तर देशात पाहिलेल्या शहरांपेक्षाही  वीज, पाणी तर मुबलक होते अन रस्ते ही आरशासारखे चकाचक होते. वा! मग, थोडे ओळखीचे चेहरे दिसल्यावर अजुन बरे वाटले....पण ती ओळख खुपच कृत्रीम आहे हे लक्षात आल्यावर मन खट्टु झालेले. रस्ते अन इमारती शी बोलता येत नव्हते अन ज्यांच्याशी बोलावेसे वाटत होते, ते माझ्याकडे पाहुण न पाहिल्यासारखे करत होते! जे दोन चार लोक ओळख देत होते, त्यांच्यातच मिळुन मिसळुन मजेत दिवस घालवत असतो! पन मनामध्ये मात्र 'गांव' आठवत राहतो. गांव हरवलेल्या माणसांमध्ये मीही सामील होतोय कि काय अशी भिती वाटायची!
        अन मग असा एखादे दिवशी मग एकटा असलो कि तो श्रीलंकन मित्र आठवतो, ती जर्मन (!) पोलीश मैत्रीण आठवते, अखंड हिंदुस्तानात हरवलेल्या गावातले दादा-दादी आठवतात... मग मला ही  माझा गाव आठवतो... तसा मी खुप शाळा शिकलेलो. खुप गावांत राहिलेलो. वडिल शिक्षक असल्याने दर दोन वर्षांनी बदलीच्या गावची नवी शाळा अन नवे मित्र मला मिळायचे. पुन:श्च हरिओम तर कित्येकदा केलेला. रस्ते, वीज, पाणी तर कित्येकदा नसायचे! पण त्यामुळे 'जगणे' काही थांबले नाही. आताशा अधुन मधुन गावाकडे गेलो कि त्यातही बरीच प्रगती झालेली दिसते! आपणही त्यात काही हातभार लावावा असे वाटते! परदेशातुन आलेले काही भारतीय आपल्या देशात काही नवे प्रकल्प सुरु करतात अशी उदाहरणे जेंव्हा स्वतः बघतो किंवा वृत्तपत्रांत वाचतो, तेंव्हा मनाला उभारी मिळते. आपल्या गावात नवे जग निर्माण करायला मी स्वतःच प्रत्यक्ष गावी जायला हवे असे काही नाही! दळणवळण अन दुरसंचारातील प्रगतीचा आधार घेतला तर दुर देशात राहुनही मी माझा गाव माझ्या स्वनांप्रमाणे सजवु शकतो! नव्हे तो मी सजवणारच असा एक विश्वास मनात येतो. मग मीही एक प्रयत्न करतो. दोन वर्षापुर्वी गावाकडे (बंधुंना सांगुन) दुध व्यवसायाची सुरुवात केली होती. खुप छान प्रतिसाद मिळाला. जवळपास चारशे कुटुंबाला त्याचा फायदा झाला. प्रकल्प छान चालल्याने त्यांचा आता अपेक्षा अजुन वाढल्यात!  अन मलाही, आपल्याच 'गावात' आपण एक पुर्णपणे 'नवे जग' निर्माण करु शकतो हा आत्मविश्वास मनात दृढ झाला!!!  श्रीलंकन मित्र, जर्मन मैत्रीण अन अखंड हिंदुस्थानी दादा-दादी पेक्षा माझे नशीब थोडे चांगले होते अन म्हणुन त्यांच्या सारखे 'गांव हरवलेला माणुस' झालो नाही याचा अतिशय आनंद झाला!
(मनोगतः  माझ्या सारखे अनेक जण दुरदेशी वसलेले असतील. त्यांनाही त्यांचा गांव आठवत असेल. व्यावहारिक अन वास्तव अडचणींमुळे काही लोक पुन्हा गावाकडे नाही जावु शकत. पण दुरदेशातुन आपल्या गावात एक नवे जग निर्माण तर करु शकतात!!  अशा समविचारी लोकांना एक व्यासपीठ मिळवुन दिले आहे ते 'ग्रंथाली प्रकाशन'' चे श्री. दिनकर गांगल साहेब ह्यांनी 'स्व.. देश'  या श्री. भुषण केळकर यांनी संपादित केलेल्या पुस्तकाच्या रुपाने! परदेशात शिक्षण वा नोकरी निमित्ताने पाच-दहा वर्षे राहुन मग भारतात परत आलेली अन स्वतंचा व्यवसाय वा आवडीचे सामाजिक प्रकल्प सुरु केलेली २५ प्रातिनिधीक उदाहरणे त्यात दिलेली आहेत. 'स्व..देश' हे केवळ पुस्तक न राहता ती एक चळवळ झालीये अश्या समविचारी लोकांना एकत्र आणणारी अन दिपस्तंभाप्रमाणे मार्ग दाखवणारी! )

करडकवाडी !

www.kardakwadi.org 

नेवासा.... कुबेराची राजधानी असलेले निधी निवास ही पुरातन नगरी पुढे १३ व्या शतकात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या पदस्पर्शाने पुनीत झाली. याच पवित्र भूमीत, मायबोलीने अमृतातेही पैजा जिंकल्या! नेवासानगरी मराठी साहित्याच्या अन्‌ वारकरी व संत संप्रदायांच्या मनांत एक वेगळे स्थान मिळवून आहे. परंतु ही नगरी काळाच्या ओघात विकासाच्या बाबत फ़ार मागे पडली. सुव्यवस्थेच्या दृष्टीने पाहता समकालीन अन्‌ नंतर स्थापन झालेल्या शहरांपे़क्षा नेवासा शहर आणि तालुका पिछाडीस आहे. जागतिक सांस्कृतिक वारश्यांमध्ये नाव नोंदवले जाण्याची पात्रता असूनही, नेवासा शहर राज्यपातळीवरील अन्‌ देशपातळीवरील तीर्थक्षेत्र अन्‌ पर्यटनाच्या नकाशावर देखील दिसत नाही. खंबीर राजकीय नेतृत्वाचा अभाव अन्‌ दूरदृष्टीच्या राजकीय नेत्यांची कमतरता, यांमुळेच नेवासा शहर अन्‌ तालुका मागासलेला राहिला.

करडकवाडी.... भारतातील पाच लाख खेड्यांपैकी एक असलेले गांव! गेल्या साठ वर्षात भारतातील अनेक खेड्यांनी, गावांनी, शहरांनी अन महानगरांनी ज्याप्रकारे रुप बदलले, त्याचे प्रातिनिधिक उदाहरण ठरावे असे एक खेडे! केवळ १० वर्षापुर्वी, फक्त १०० च्या आसपास लोकवस्ती असलेली करडकवाडी, नव्या युगात, अहमदनगर-औरंगाबाद (राज्य महामार्ग क्र. ६०) अन बीड-नासिक (राज्य महामार्ग क्र. ४४) च्या संगमावर वसलेली आहे.करडकवाडी गावापासुन ११ कि.मी. वर गोदावरी अन प्रवरा या दोन जीवनवाहिन्यांचा संगम होतो (श्री क्षेत्र प्रवरासंगम). करडकवाडी गावापासुन ६० कि.मी. अंतरावर शिर्डी, २० कि.मी. अंतरावर जगप्रसिद्ध श्री शनि मंदिर (श्री क्षेत्र शनिशिंगणापुर), अन ७ कि.मी. वर श्री क्षेत्र देवगड (श्री दत्त संस्थान) आहे. दळणवळणाची साधणे वाढल्याने गावातुन जाणारे दोन्ही राज्य महामार्ग ओसंडुन वाहु लागले, अन करडकवाडी ची लोकसंख्या १०० पासुन १०,००० वर जाऊन पोहचली.
आज मुकिंदपुर (नेवासा फाटा) नावाने ओळखले जाणारे मुळ करडकवाडी गांव मराठवाड्याचे प्रवेशद्वार मानले जाते. अहमदनगर अन औरंगाबाद पासुन प्रत्येकी ५५ किमी अंतरावर असलेले हे गांव, मुळ गावकरी, व्यवसायानिमित्त आलेले लोक, तालुका अन जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे-येणे सहज शक्य असल्याने इथे येउन राहिलेले मध्यमवर्गीय लोक, यांच्या संमिश्र लोकवस्तीमुळे 'छोटी मुंबई' ठरतेय.
या उपक्रमाला 'करडकवाडी, वैश्विक खेडे उपक्रम...' हे नाव देताना, आमच्या मनात आहे ते भारतीय राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तुत्व, श्री संत ज्ञानेश्वरांची पुण्यभुमी, महात्मा गांधी यांची ग्रामविकासाची संकल्पना, अन औद्योगिकरणामुळे-शहरीकरणामुळे रुप पालटलेले भारतातील एक प्रातिनिधीक गांव!

हे सर्व कशासाठी

www.kardakwadi.org 

कुबेराची राजधानी असलेल्या 'निधी-निवास' नगरीला तिचे भौतिक व सांस्कृतिक वैभव पुन्हा प्राप्त करून देणे, हे आमचे प्रमुख ध्येय आहे. श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले नेवासा शहर अन‌ नेवासा तालुका यांचा सर्वांगीण विकास (भौतिक, शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक आणि राजकीय) या गोष्टींचा विचार हा श्री बाळकृष्ण ज्ञान केंद्राचा उद्देश आहे.
कुबेराची राजधानी असलेले निधी निवास ही पुरातन नगरी पुढे १३ व्या शतकात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या पदस्पर्शाने पुनीत झाली. याच पवित्र भूमीत, मायबोलीने अमृतातेही पैजा जिंकल्या! नेवासानगरी मराठी साहित्याच्या अन्‌ वारकरी व संत संप्रदायांच्या मनांत एक वेगळे स्थान मिळवून आहे. परंतु ही नगरी काळाच्या ओघात विकासाच्या बाबत फ़ार मागे पडली. सुव्यवस्थेच्या दृष्टीने पाहता समकालीन अन्‌ नंतर स्थापन झालेल्या शहरांपे़क्षा नेवासा शहर आणि तालुका पिछाडीस आहे. जागतिक सांस्कृतिक वारश्यांमध्ये नाव नोंदवले जाण्याची पात्रता असूनही, नेवासा शहर राज्यपातळीवरील अन्‌ देशपातळीवरील तीर्थक्षेत्र अन्‌ पर्यटनाच्या नकाशावर देखील दिसत नाही. खंबीर राजकीय नेतृत्वाचा अभाव अन्‌ दूरदृष्टीच्या राजकीय नेत्यांची कमतरता, यांमुळेच नेवासा शहर अन्‌ तालुका मागासलेला राहिला. प्रवरामाईच्या कुशीत वसलेल्या ह्या नगरीला पुन्हा एक स्वप्न दाखवायचे आहे. नेवासानगरीला तिचे गतवैभव पुन्हा मिळवून देण्याची मनात जिद्द अन्‌ मनगटात जोर असणार्‍या सर्वांसाठी हे खुले व्यासपीठ!
*****
करडकवाडी गांव आणि नेवासा तालुका हि फक्त प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. महाराष्ट्रातील कुठल्याशी गावात वा शहरात जर कुणी असा प्रयत्न करणार असेल, तर त्या प्रयत्नाला यथाशक्ती मदत करण्याची ग्वाही आम्ही देउ इच्छितो. 'बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो' अशी जिद्द बाळगणार्‍या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

*****
मूलतः नेवासा तालुक्यातील परंतु सध्या शिक्षण/नोकरीसाठी देशा-विदेशांमध्ये कार्यरत असलेल्या तरुणांच्या मदतीने ही चळवळ आकार घेत आहे. नेवासा तालुक्यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक क्षेत्रांमधील नवीन कल्पना राबवून ज्ञानाधिष्ठित समाजाच्या निर्मितीसाठी एक पाऊल टाकण्याचा हा प्रयत्न आहे. शिक्षण, शेती, आरोग्य या मूलभूत विषयांवर जनजागृती करणे अन्‌ 'मानवी विकास निर्देशांकाबद्दल' (Human Development Index) सामान्य जनतेला जागृत करणे, विकसित देशांतील समाजांप्रमाणे विकसित समाजाचे स्वप्न भारत देशामध्ये साकार करण्याच्या अनेक प्रयत्नांना हातभार लावणे, हा श्री बाळकृष्ण ज्ञान केंद्राचा हेतू आहे.
उद्दिष्टे:  नेवासा तालुका हे एक प्राथमिक युनिट मानून पुढील कार्यक्रम राबवणे:
१) प्रगत राष्ट्रांमधील नागरिकांच्या राहणीमानाच्या दर्जाप्रमाणेच, ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे आणि 'मानवी विकास निर्देशांक' या संकल्पनेची ओळख सर्वसामान्यांना करून देणे. सामान्य नागरिकाचे दैनंदिन जगणे सुसह्य व्हावे यासाठी हरप्रकारे प्रयत्न करणे.
२)ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीमध्ये मदत करणे. शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत ग्रामीण विद्यार्थी ज्या क्षेत्रांत मागे पडतात, ती क्षेत्रे लक्षात घेऊन त्या उणिवा दूर करण्यासाठी ग्रामीण विद्यार्थ्यांना साहाय्य करणे.
३) तरुणांना उच्चशिक्षणासंबंधी संधींची, रोजगाराच्या अन्‌ स्वयंरोजगाराच्या संधींबद्दल माहिती पुरवणे.
४) शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी, क्रीडा, आरोग्य, सामाजिक अन्‌ राजकीय क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांचे आणि तरुणांचे प्रबोधन करणे.
५) सामान्य नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे.

सर्वसाधारण उद्दिष्टे:
शेती: शेतीकडे व्यावसायीक दृष्टीने पाहणे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यने उत्पादन वाढवणे अन खर्च कमी करणे. घरातील एक व्यक्ती शेतीकडे अन एक व्यक्ती शेती आधारित उद्योगाकडे वळवणे. शेतीच्या माध्यमातुन खेडी स्वयंपुर्ण करण्याचा प्रयत्न करणे.
आरोग्यः सर्वसामान्य आरोग्य विषयक सल्ला अन सेवा. साथीचे अन संसर्गजन्य आजारापासुन सामान्य जनतेचे रक्षण होईल अशी माहीती जनतेला उपलब्ध करुन देणे. सरकाती आरोग्य सेवेबद्दल/योजनांबद्दल माहिती देणे, हृदयरोग, कर्करोग यांसारख्या दुर्धर आजारांशी लढा देण्यासाठी जनतेला मार्गदर्शन करणे, तालुक्याच्या ठिकाणाहुन अहमदनगर-पुणे-मुंबई ला रुग्णवाहतुक करण्यासाठी अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध करणे.
शिक्षणः तालुक्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण- नोकरी- स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती करुण देणे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागातील विद्यार्थ्यां बरोबर स्पर्धा करण्यासाठी करडकवाडी येथे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण केंद्र सुरु करणे. तालुक्यामध्ये वाचन संकृतीचा विकास करणे, त्यासाठी एक सुसज्ज ग्रंथालय उभे करणे. (ऑनलाईन पुस्तक खरेदी सुविधा उपलब्ध करुन देणे).
क्रिडा: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खेळामध्ये प्राविण्य मिळविण्यासाठी मैदानी अन इन-डोर खेळाची साधणे उपलब्ध करुन देणे. त्यांच्यासाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडुंची मार्गदर्शनपर शिबीरे आयोजीत करणे. विशेषतः मुलींना खेळामध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करणे. सशक्त, निरोगी अन निकोप स्पर्धा करणारी पिढी घडवण्यासाठी प्रयत्न करणे!
राजकीय: सत्ता हे समाजसेवेचे प्रभावी साधन आहे, हा विचार समाजामधे रुजवणे. सुशिक्षित तरुणांनी राजकीय क्षेत्राकडे वळावे म्हणुन प्रयत्न केले जातील. योग्य उमेदवार निवडले जावेत म्हणुन जनतेचे प्रबोधन केले जाईल. उमेदवाराकडे किती संपत्ती आहे, त्यापेक्षा त्याच्या मतदारसंघातील जनतेसाठी काय योजना आहेत, सामाजीक जीवनामध्ये तो किती प्रामाणिक आहे, पुढील पिढी साठी काय स्वप्नं आहेत, हे पाहिले पाहिजे. निवडणुक गैरप्रकारांना आळा घालणे, पैसा, गुंडशाही ला विरोध करणे अन ग्रामपंचायत ते लोकसभा पातळीवर सुशिक्षित उमेदवारांना पाठींबा दिला जाईल. प्रचलित जात-धर्म-संपत्ती आधारित राजकारण सोडुन, विकसित जगात ज्याप्रमाणे 'विकासाचे राजकारण' केले जाते त्याप्रमाणे राजकीय चळवळ उभारणे, हे आमचे उद्दिष्ठ आहे.

सुस्वागतम !!!

आज 'श्री बाळकृष्ण ज्ञान केंद्र, करडकवाडी' आणि 'करडकवाडी...वैश्विक खेडे उपक्रम' ह्या उपक्रमाचे हे संकेतस्थळ प्रकाशित करत असताना आम्हांला मनापासून आनंद होतो आहे.  www.kardakwadi.org 

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांच्या वास्तव्य असलेल्या नेवासा तालुक्यामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर, वाचण संस्कृतीचा विकास याद्वारे ग्रामविकासाची संकल्पना मनात ठेऊन 'करडकवाडी- वैश्विक खेडे उपक्रम' राबविला जात आहे.

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आणि युवक- युवतींना उच्च-शिक्षण, शेती, आरोग्य, क्रीडा, सामाजिक आणि राजकीय विषयांवर सहकार्य करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविला जात आहे. ग्रामीण भागातील युवकांसाठी 'ज्ञान केंद्रा'ने अनेक उद्दिष्टे समोर ठेवली आहेत. त्यापैकी प्रगत राष्ट्रांमधील नागरिकांच्या राहणीमानाच्या दर्जाप्रमाणेच, ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे आणि 'मानवी विकास निर्देशांक' या संकल्पनेची ओळख सर्वसामान्यांना करून देणे. सामान्य नागरिकाचे दैनंदिन जगणे सुसह्य व्हावे यासाठी सर्वप्रकारे प्रयत्न करणे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीमध्ये मदत करणे. शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत ग्रामीण विद्यार्थी ज्या क्षेत्रांत मागे पडतात, ती क्षेत्रे लक्षात घेऊन त्या उणिवा दूर करण्यासाठी ग्रामीण विद्यार्थ्यांना साहाय्य करणे. तरुणांना उच्चशिक्षणासंबंधी संधींची, रोजगाराच्या अन्‌ स्वयंरोजगाराच्या संधींबद्दल माहिती पुरवणे. शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी, क्रीडा, आरोग्य, सामाजिक अन्‌ राजकीय क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांचे आणि तरुणांचे प्रबोधन करणे आणि सामान्य नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे, अशी काही महत्त्वाची उद्दिष्टे आहेत.
शहरांमध्ये आणि प्रगत देशांमध्ये 'माहितीचा स्फोट' होत असतानाच ग्रामीण भागात मात्र माहितीच्या अभावामुळे 'बौद्धिक कुपोषण' होत आहे. ग्रामीण  आणि शहरी भागातील विद्यार्थी, युवक-युवती यांच्या मध्ये एक सहकार्याचा सेतु बांधण्याचे काम या ज्ञान केंद्राला करण्यात येणार आहे.
निसर्गाचे वरदान आणि कर्तुत्ववान व्यक्तिमत्वांचा खजिना असलेल्या आपल्या भागातील प्रागतिक विचारांच्या युवकांना एकत्रीत करणे गरजेचे आहे.  शिक्षण, संशोधन, क्रीडा, शेती, आरोग्य यांचा आलेख दर्शवणार्‍या 'मानवी विकासाच्या निर्देशांकाची' संकल्पना ग्रामीण जनतेमध्ये रुजवणे गरजेचे आहे. म्हणुन, ग्रामीण सुशिक्षित युवकांचे संघटन करण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यादृष्टीने श्री बाळकृष्ण ज्ञान केंद्र ह्या संस्थेची स्थापना केली गेली आहे.


आपल्या सूचना, मार्गदर्शन आणि सहकार्याची अपेक्षा. धन्यवाद!
ई-मेलः kardakwadi@gmail.com