आता गुळाला स्वाद आंबा, चॉकलेट अन् केळीचा!
सकाळ वृत्तसेवा
Saturday, November 06, 2010 AT 12:30 AM (IST)
मधुकर कांबळे - सकाळ वृत्तसेवा
औरंगाबाद - पंढरपूर-वाळूज रस्त्यावर वळदगाव शिवारात अभिजित देशमुख आणि प्रशांत कुंडलिक माने या दोघा मित्रांनी हायटेक गुऱ्हाळ थाटले आहे. या गुऱ्हाळात नैसर्गिक पद्धतीने गूळ तर बनतोच, पण त्यात भर पडली आहे ती चॉकलेट, आंबा, केळी, गावरान तूप आणि स्ट्रॉबेरी फ्लेवरची !
सहकार महर्षी (कै.) बाळासाहेब पवार ऍग्रो बेसड् इंडस्ट्री या नावाने हा प्रकल्प आकाराला येतो आहे. या गुऱ्हाळातील गुळाच्या अर्धा, एक, दोन, पाच आणि दहा किलोच्या भेल्या (ढेपी) शहरातील निवडक मॉलमध्ये तसेच थेट विक्रीसाठी ठेवण्याची त्यांचीही योजना आहे. याशिवाय खव्यासारखा ओला गूळ, गुळाची काकवी (पाक) आणि गूळ पावडर बाजारात आणली जाणार आहे. या मित्रांनी सध्या दररोज 75 टन उसाचे गाळप करणारे प्रत्येकी तीन कढयांचे पाच संच बसविले असून साखर कारखान्यांच्या बरोबरीने 1400 रुपये प्रतिटन भावही ते शेतकऱ्यांना देत आहेत. ऊस तोडणीसाठी प्रत्येक टोळीत 18 ते 20 कामगार असलेल्या चार टोळ्या तोडणीचे काम करीत आहेत. ऊसतोडणीसाठी प्रतिटन 200 तर गाळपासाठी 250 रुपये मजुरी ते देतात. गुऱ्हाळाची मुख्य जबाबदारी उत्तर प्रदेशातील कामगारांवर आहे. वीज बिलावरही मोठा खर्च आहे. या प्रकल्पात त्यांना सचिन माने आणि संजय पाटील मदत करत आहेत.
साधारणपणे एक टन उसापासून 110 किलो गुळ उत्पादित होतो. सध्या हा गूळ जालना, जळगाव आणि चाळीसगावच्या मार्केटमध्ये पाठविला जात असून प्रति क्विंटलला सरासरी 2700 रुपये भाव मिळत आहे. गूळ तयार करण्यासाठी कोणत्याही रसायनाचा वापर केला जात नाही. पूर्णपणे रसायनमुक्त असलेला हा सेंद्रिय गूळ शहरातील मॉलमध्ये डिसेंबरपासून अर्ध्या किलोपासून ते दहा किलोपर्यंतच्या पॅकमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात येणार असल्याचे श्री. देशमुख आणि श्री. माने यांनी सांगितले.
आपला स्वच्छतेवर तसेच गुणवत्तापूर्ण आणि खाण्यासाठी स्वादिष्ट गूळ निर्मितीवर भर असून गावरान तूप, आंबा, केळी, स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट फ्लेवरच्या गूळाचे उत्पादन सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले.
गुळाची दुबईला निर्यात
वळदगावात उत्पादित झालेला हा गुळाला त्याच्या सेंद्रिय गुणवत्तेमुळे नुकतीच दुबई येथून 15 टन गुळाची मागणी नोंदविण्यात आली आहे. 28 जानेवारीला हा गूळ दुबईला पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
औरंगाबाद - पंढरपूर-वाळूज रस्त्यावर वळदगाव शिवारात अभिजित देशमुख आणि प्रशांत कुंडलिक माने या दोघा मित्रांनी हायटेक गुऱ्हाळ थाटले आहे. या गुऱ्हाळात नैसर्गिक पद्धतीने गूळ तर बनतोच, पण त्यात भर पडली आहे ती चॉकलेट, आंबा, केळी, गावरान तूप आणि स्ट्रॉबेरी फ्लेवरची !सहकार महर्षी (कै.) बाळासाहेब पवार ऍग्रो बेसड् इंडस्ट्री या नावाने हा प्रकल्प आकाराला येतो आहे. या गुऱ्हाळातील गुळाच्या अर्धा, एक, दोन, पाच आणि दहा किलोच्या भेल्या (ढेपी) शहरातील निवडक मॉलमध्ये तसेच थेट विक्रीसाठी ठेवण्याची त्यांचीही योजना आहे. याशिवाय खव्यासारखा ओला गूळ, गुळाची काकवी (पाक) आणि गूळ पावडर बाजारात आणली जाणार आहे. या मित्रांनी सध्या दररोज 75 टन उसाचे गाळप करणारे प्रत्येकी तीन कढयांचे पाच संच बसविले असून साखर कारखान्यांच्या बरोबरीने 1400 रुपये प्रतिटन भावही ते शेतकऱ्यांना देत आहेत. ऊस तोडणीसाठी प्रत्येक टोळीत 18 ते 20 कामगार असलेल्या चार टोळ्या तोडणीचे काम करीत आहेत. ऊसतोडणीसाठी प्रतिटन 200 तर गाळपासाठी 250 रुपये मजुरी ते देतात. गुऱ्हाळाची मुख्य जबाबदारी उत्तर प्रदेशातील कामगारांवर आहे. वीज बिलावरही मोठा खर्च आहे. या प्रकल्पात त्यांना सचिन माने आणि संजय पाटील मदत करत आहेत.
साधारणपणे एक टन उसापासून 110 किलो गुळ उत्पादित होतो. सध्या हा गूळ जालना, जळगाव आणि चाळीसगावच्या मार्केटमध्ये पाठविला जात असून प्रति क्विंटलला सरासरी 2700 रुपये भाव मिळत आहे. गूळ तयार करण्यासाठी कोणत्याही रसायनाचा वापर केला जात नाही. पूर्णपणे रसायनमुक्त असलेला हा सेंद्रिय गूळ शहरातील मॉलमध्ये डिसेंबरपासून अर्ध्या किलोपासून ते दहा किलोपर्यंतच्या पॅकमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात येणार असल्याचे श्री. देशमुख आणि श्री. माने यांनी सांगितले.
आपला स्वच्छतेवर तसेच गुणवत्तापूर्ण आणि खाण्यासाठी स्वादिष्ट गूळ निर्मितीवर भर असून गावरान तूप, आंबा, केळी, स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट फ्लेवरच्या गूळाचे उत्पादन सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले.
गुळाची दुबईला निर्यात
वळदगावात उत्पादित झालेला हा गुळाला त्याच्या सेंद्रिय गुणवत्तेमुळे नुकतीच दुबई येथून 15 टन गुळाची मागणी नोंदविण्यात आली आहे. 28 जानेवारीला हा गूळ दुबईला पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment